गणेशवाडी गावच्या पाझर तलावाची ऐन उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटली, दहा वर्षांपासुन रुंदीकरणाचे काम ठप्प, शेती पिकांना पाणी टंचाईचा फटका

सावरवाडी प्रतिनिधी :
कडक उन्हाळा ऋतूमध्ये पाझर तलावातून पाणी साठवण क्षमता कमी झाली . तलावाच्या होणाऱ्या गळतीचे काम रखडले गेले . तलावाच्या रुंदीकरणाचा प्रश्न वर्षानूवर्ष ऐरणीवर आहे . या पाश्र्वभुमीवर गणेशवाडी ( ता. करवीर ) गावच्या पाझर तलावात ऐन उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटली आहे . पाण्याअभावी शेती पिकांचे नुकसान होऊ लागले .
राज्य शासनाच्या गेल्या पंधरा वर्षापूर्वी जलसंरक्षण विभागाने या पाझर तलावाची उभारणी केली . या तलावाची उंची १४ .८७ मीट र आहे . लांबी १५५ मीटर आहे . पाणी साठवण क्षमता ११८ .५८ मी . व लाभक्षेत्र २५ हेक्टर आहे . तांडवा विसर्ग २२ . ४० घन मी सेंकद आहे .
हा पाझर तलाव दरवर्षी पावसाळा ऋतू मध्ये पावसाच्या पाण्याने भरला जातो . ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेर या तलावातील पाणी वापरले जाते . मात्र तलावाच्या भरावातून पाण्यास गळती लागते परिणामी पाणी साठा हळूहळू कमी होत असतो . मार्च ते मे महिन्यात पाणी साठवण क्षमता कमी होत असते . परिणामी ऐन उन्हाळ्यात शेती पिकांना पाणी टंचाईचा फटका बसतो .
डोंगरी भागात उभारलेल्या या पाझर तलावाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागले नाही . शासकिय निधी अभावी तलावाची दुरवस्था निर्माण झाली आहे . डोंगरी भागातील लाभक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी पाझर तलावामध्ये पाणी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे आहे .