निधन वार्ता
सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब जोती कदम उर्फ हरिओम बाबा यांचे निधन.

आजरा :
हंदेवाडी ता,आजरा येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब जोती कदम उर्फ हरिओम बाबा वय 78 वर्ष यांचे शुक्रवारी पहाटे 3 च्या सुमारास अल्पशा आजाराने गोआ येथील बांबोली या सरकारी दवाखान्यात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. ते गोव्यातील खनिज कम्पणीतून मॅनजर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते, तर आजरा तालुका ज्येष्ठ नागरिक संघासाठी त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. गावातही त्यांनी सामाजिक व वैयक्तिक कामेही केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले ,मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.