जीवनमंत्रताज्या बातम्यामनोरंजन
माणगावच्या स्नेहल ने पटकावला ‘मिस रॉयल फेस ऑफ मुंबई 2021’ किताब

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
माणगाव तालुका चंदगड येथील सौ शालन व शंकर शिवाजी नौकुडकर यांची सुकन्या सौ स्नेहल श्रीकांत भोपळे हिने ‘मिस रॉयल फेस ऑफ मुंबई 2021’ हा किताब पटकावला असून तिचे चंदगड तालुक्यातून कौतुक होते आहे. यापूर्वी तिने मिग मिसेस इंडियन ग्लोब 2020 हा किताब पटकावला होता. सौ. स्नेहल ह्या चारकोप मुंबई येथे ब्युटिशीयन असून मॉडेलिंग हि करतात. असेच एका छोटया लाईव्ह कार्यक्रमासाठी त्या गेल्या होत्या, तिथूनच त्यांना मॉडेलिंगसाठी फोन आला व त्या ट्रायला दिल्लीला गेल्या व तिथेही त्यांनी ‘किताब पटकावला. यासाठी त्यांना त्यांची सासरची मंडळी, पती श्रीकांत, मुलगा,आई,वडील ,भाऊ, वहिनी, भाची या सर्वांचे योगदान लाभले असून त्यांनी या माध्यमातून आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.