कडगांव हायस्कूल येथे ‘ओळख सापांची’ कार्यक्रम संपन्न
कडगाव प्रतिनिधी :
भुदरगड शिक्षण संस्था गारगोटी संचलित कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव या या शाळेत ‘ओळख सापांची’ कार्यक्रम संपन्न झाला. वन विभाग कडगाव सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट कोल्हापूर शिवाज्ञा गड किल्ले संवर्धन संघटना भुदरगड व रेस्क्यू टीम भुदरगड, राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. पल्लवी चव्हाण उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सर्पमित्र देवेंद्र भोसले कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. सह्याद्री पर्वतातील विविध सापांची ओळख त्यांनी करून दिली. यावेळी मुख्याध्यापक डॉ. आर डी पोवार, विनायक आळवेकर, आशुतोष सूर्यवंशी, कडगावचे वनपाल दत्तात्रय जाधव, कुलदीप पाटील ,दिलीप आबिटकर, अजिंक्य बच्चे, किरण कुंभार ,स्वप्निल देसाई ,डी .जी. पाटील सत्यजित चोरगे, बी .एस. राणे ,वजीर मकानदार, चंद्रकांत लिमकर, ए .एम. भडगावकर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक ए. डी .देसाई यांनी केले. राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक चंद्रकांत मासाळ यांनी सर्वांचे आभार मानले.