सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधलाय ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा नारायण राणे यांना टोला

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
गेल्या अनेक वर्षापासून चिपी विमानतळाचा मुद्दा चर्चेत होता. त्यानंतर आता चिपी विमानतळ आजपासून सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरून आता राजकारण अखेर तापलेलं दिसत आहे. आज या चिपी विमानतळाचं उद्घाटन कार्यक्रमात जोरदार राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोमणे मारले आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे, नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधलाय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. बाळासाहेबांना खोटं बोलणारी माणसं आवडत नव्हती, त्यामुळे त्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना लगावला आहे.
आताचा आजचा हा क्षण आदळ आपट नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. पर्यटनावर तळमळीनं आणि मळमळीनं बोलणं वेगळं आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे अधिक तळमळीने बोलत होते. पाठांतर करून बोलणं आणि आत्मसात करून बोलणं वेगळं आहे. शिवसेना आणि कोकणाचं नातं काही वेगळं सांगायला नको, असं मुख्यमंत्री या कार्यक्रमात म्हणाले आहेत.
दरम्यान, ही जाहीर सभा नाही, दुर्देवानं आणि नाईलाजानं बोलावं लागतंय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले, पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.