सिध्दनेर्ली : गोकुळ दूध संघ सक्षम असल्याने लसीकरण हाती ; गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गोकुळ दूध संघ सक्षम असल्याने लसीकरणाचे काम आम्ही हाती घेतले आहे, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक श्री. नविद मुश्रीफ यांनी केले. ते सिध्दनेर्ली तालुका कागल येथील आयोजित केलेल्या लम्पी लसीकरण कार्यक्रम बोलत होते.
यावेळी नविद मुश्रीफ म्हणाले, एखाद्या गावात लम्पी स्क्रीनचे बाधित जनावरे आढळली, तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ नजीकच्या गोकुळ दूध संघाच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. गोकुळ दूध संघामार्फत संबंधित जनावरांवर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. या संसर्गा विषयी उत्पादकांनी घाबरून जाऊ नये, आवश्यक ती काळजी घ्यावी.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक व जिल्हा परिषदेचे सदस्य अमरीष घाटगे, जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, सरपंच दत्तात्रय पाटील, उपसरपंच संगीता पोवार, कृष्णात मेटील, विलास पोवार, एम.बी. पाटील, संदीप गुरव, युवराज पाटील, रामदास घराळ, सदाशिव निकम, इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.