ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गौरी पाटीलला कुस्तीत कास्य

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
जालंदर (पंजाब) येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुलाची कुस्तीगीर गौरी मधुकर पाटील हिने ५३ किलो वजन कास्यपदक पटकावले. तिला एनआयएस आंतरराष्ट्रीय कुस्ती दादासो लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.