ताज्या बातम्यामहाराष्ट्र
श्रीशैल पाटील यांची कोल्हापूर जिल्हा भाजपा विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड

तुरंबे प्रतिनिधी :
बेलवळे बुद्रुक, ता. कागल येथील युवानेते श्रीशैल पाटील यांची भारतीय जनता पार्टी विद्यार्थी युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष रमाकांत कापसे यांनी निवडीची घोषणा केली.
त्यांना खा. धनंजय महाडिक, राजे समरजितसिंह घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल देसाई ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धिरज करलकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शहाजी यशवंत पाटील , पार्थ सावंत, अर्जुन पाटील, अभिनंदन पाटील, योगेश गुरव, शुभम पाटील, प्रथमेश शिंदे व प्रणित पाटील आदी उपस्थितीत होते.