“शाहू “च्या सभासद व कर्मचारी यांचेवतीने श्री गहिनीनाथ गैबीपिरास गलेफ अर्पण व श्रीराम मंदिर येथे अभिषेक विधी सोहळा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२मध्ये उच्चांकी ऊस गाळप केलेबद्दल आज कागल येथे श्री गहिनीनाथ गैबीपिरास गलेफ अर्पण श्री राम मंदिर येथे अभिषेक विधी सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.
शाहू कारखान्याने नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामामध्ये 10 लाख 77 हजार 548 मे.टन उच्चांकी ऊस गाळप करून नव्या रेकॉर्ड ची नोंद केली या प्रत्यर्थ आज ग्रामदैवत श्रीगहिनीनाथ गैबीपिरास गलेफ अर्पण व श्री राम मंदिर येथे अभिषेक विधीसोहळ्याचे आयोजन सभासद व कर्मचारी यांचे वतीने केले होते.शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे या उभयंतांच्या हस्ते गलेफ अर्पण व अभिषेक विधी संपन्न झाला.
श्रीराम मंदिर कागल येथून घाटगे दांपत्यानी मिरवणुकीने टाळ-मृदुंग व इतर वाद्यांच्या गजरात गलेफ गैबीपर्यंत नेला.यावेळी आंबील प्रसादाच्या सजविलेल्या घागरी घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या .फटाक्यांची आतषबाजी व साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कारखान्याचे सर्व संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी.पाटील,
उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, त्यांचे सर्व संचालक यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी, सभासद, महिला नागरिक हितचिंतक,कार्यकर्ते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.