वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर : मुरगुड- मुदाळ तिट्टा वाहतुक बंद

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गेले दोन दिवस झालेल्या संततधार पर्जन्यवृष्ठीमुळे तसेच धरण क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी झालेमुळे वेदगंगा नदीवरील कुरणी, सुरूपली , बस्तवडे व चिखली बंधारे पाण्याखाली गेले आहेत .तर मुरगूड – निढोरी दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने मुरगूड – मुदाळ तिट्टा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
पावसामुळे वेदगंगेचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे .त्यामुळे नदी लगतच्या ऊस व भात पिकांमध्ये पाणी शिरले असून पिके जलमय झाली आहेत. दमदार पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला आहे . तर शेतशिवारात पाणीच पाणी झाले आहे.q
कुरणी, सुरूपली , बस्तवडे व चिखली बंधारे पाण्याखाली गेल्याने मुरगूड शहराकडे या मार्गा वरून ये – जा करणारी वाहतूक बंद झाली आहे. तसेच वेदगंगेचे पाणी मुरगूड – निढोरी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने मुरगूडहुन कोल्हापूर, कागल, राधानगरी, गारगोटी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे