मुदाळतिट्टा येथील साई बजार मध्ये श्रावण मास धमाका; ग्राहकांना पैठणी जिंकण्याची खास संधी

मुदाळ तिट्टा :
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. यावर्षी ही पवित्र श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल.

मुदाळ तिट्टा येथील साई बझार मध्ये विविध ऑफरची पर्वणी श्रावण महिन्यात ठेवण्यात आली आहे. गुलाबजामूनच्या एका पाकिटावर एक पाकीट मोफत मिळत असून त्यामध्ये असणाऱ्या कुपन द्वारे भाग्यवान ग्राहकाला पैठणी जिंकण्याची संधी आहे.
एक हजार रुपयाच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ग्राहकांना मिळणार असून मुदाळ तिट्टा, मुदाळ, कूर, बिद्री, आदमापूर, बोरवडे, उंदरवाडी येथील व आसपासच्या गावातील ग्राहकांना एक हजार रुपयेच्या खरेदीवर फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहे.
उपवासाचे पदार्थ विशेष सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
फेना निरमा पाच किलो बॅगवर दोन किलो फेना निरमा मोफत व तीन किलो फेना निरमा बॅगवर एक किलो फेना निरमा मोफत मिळत असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
महादेव-गौरीची पूजा
श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ आणी तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.
यावर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार असतील
💠 पहिला श्रावण सोमवार – 09 ऑगस्ट 2021
💠 दुसरा श्रावण सोमवार – 16 ऑगस्ट 2021
💠 तिसरा श्रावण सोमवार – 23 ऑगस्ट 2021
💠 चौथा श्रावण सोमवार – 30 सप्टेंबर 2021
💠 पाचवा श्रावण सोमवार – 06 सप्टेंबर 2021