धक्कादायक : कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर मावस भावाने केला अत्याचार; कागल पोलिसांत तक्रार दाखल; मुलगी तीन महिन्याची गरोदर

कोल्हापूर प्रतिनिधी :
मावशीच्या घरी राहण्यासाठी आलेल्या १५ वर्षाच्या अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणीवर मावसभावाने अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी मुलीस त्रास होवू लागल्यानंतर ती तीन महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा गुन्हा कागल पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पुलाची शिरोली (तालुका : हातकणंगले) येथील ऋत्विक शिवाजी सुतार (वय २१) याला पोलिसांनी अटक केली आहे.
ऋत्विक शिवाजी सुतार व अल्पवयीन मुलगी हे नात्याने सख्खे मावस बहिण- भाऊ आहेत. अल्पवयीन मुलगी कसबा सांगाव येथील असून ती पुलाची शिरोली एमआयडीसी येथे राहत असलेल्या आपल्या मावशीकडे राहण्यास आली होती.
ऋत्विक सुतार याने दिनांक ३० जून २०२१ ते २ जुलै २०२१ दरम्यान तिच्यावर अत्याचार केला. यानंतर ऋत्विकने तिला याबद्दल कोणाला काही सांगू नकोस अशी धमकी दिली.
यानंतर काही दिवसांनी अल्पवयीन मुलीस त्रास सुरू झाल्यावर आईने तिला कसबा सांगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी तात्काळ मुलगीकडे अधिक चौकशी केली मात्र, संबंधित मुलीने घाबरून याबाबतची कोणतीही माहिती सांगितलेली नाही. यामुळे कोल्हापूर येथील बाल कल्याण समितीतील कन्या निरीक्षण गृह येथे संबंधित मुलगीला १ सप्टेंबर २०२१ रोजीपर्यंत दाखल करण्यात आले आहे.