खरी शिवसेना कोणाची ; सुनावणी सुरु.

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची ? या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून, ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.
सकाळपासून उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांच्यात युक्तिवाद झाला. आता निवडणूक आयोगाच्यावतीने अरविंद दातार हे कोर्टासमोर आपली भूमिका मांडत आहेत.
निवडणूक आयोगाच्यावतीने अरविंद दातार यांनी युक्तिवाद सुरु केला आहे. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था असल्याचं म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाची भूमिका ही अध्यक्षांच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे भिन्न आणि स्वतंत्र असल्याचेही म्हटले आहे. संसदेने राज्यघटनेतील अपात्रता आणि लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत अपात्रता यामधील फरक स्पष्टपणे यावेळी सांगितला. निवडणूक आयोग आधी तक्रार घेतं, नंतर पुरावे, प्रतिज्ञापत्र आणि चौकशी करतं असं अरविंद दातार यांनी घटनापीठाला सांगितलं. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला पाठवण्यात आलेल्या नोटीसचंही वाचन केलं.
जेव्हा खरी शिवसेना कोणती ? असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाकडेच आहे आणि त्यांनीही हे सांगितलं आहे. एकदा निर्णय घेतल्यानतंर ते विरुद्ध भूमिका घेऊ शकत नाही असं शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी कोर्टात म्हटलं आहे