शिवराज विद्यालयात एन.एम.एम.एस (NMMS) परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा वह्या व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील शिवराज विद्यालयात एन एम एम एस (NMMS) परीक्षेत 38 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती तर 91 विद्यार्थ्यांनी सारथी शिष्यवृत्ती मिळवत शिवराजच्या परंपरेत गुणवत्तेचा झेंडा रोवत दणदणीत यश संपादन केले. याबद्दल नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी प्राचार्य मेजर जी.के भोसले यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा वह्या व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक पी.डी.रणदिवे, एस.एस. सुतार, रवींद्रकुमार जालीमसर यांचाही शाल, कोल्हापुरी फूर टोपी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक संतोष कुडाळकर, पर्यवेक्षक व्ही. डी. खंदारे यांचेसह शाळेचा सर्व स्टाफ हजर होता.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी माजी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष युवा नेते वीरेंद्र मंडलिक व कार्यवाह अण्णासो थोरवत यांचे प्रोत्साहन मिळाले.