सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिवम माळकर प्रथम क्रमांकाचा मानकरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड च्या वतीने लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंती निमित्त आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भारतीय विद्यापीठ पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगली या महाविद्यालयाच्या शिवम संजय माळकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला व तो सदाशिवराव मंडलिक चषक चा मानकरी ठरला त्याला रोख रुपये पाच हजार एक, फिरता चषक, कायमचा चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके त्याने मिळवली तर द्वितीय क्रमांक सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थिनी कु. ज्ञानदा राजेंद्र धारणकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला तिला रोख तीन हजार एक रुपये, कायमचा चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके मिळवली तर तृतीय क्रमांक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी ता. चंदगड चा विद्यार्थी रायमन जॉन्सन मंतेर या विद्यार्थ्याने पटकवला त्याला रोख दोन हजार एक रुपये, कायमचा चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके मिळाली. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी बोलताना डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले की वक्तृत्वातून विद्यार्थ्यांचे प्रचंड वाचन होते त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व कॉलेज जीवनात घडत जाते समाजातील कर्तृत्ववान माणसे वक्तृत्वातून पुढे गेलेली आहेत. गेली वीस वर्षे या स्पर्धा सातत्याने महाविद्यालयात होत आहेत महाराष्ट्रातील या नामांकित स्पर्धा असून या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकाने समाजाला योग्य दिशा देण्याचे काम भविष्यात आपल्या वक्तृत्वातून करावे असे आवाहन डॉ.कुंभार यांनी केले
या स्पर्धेची पारितोषिके जय शिवराय एज्युकेशन सर्व्हंट्स, को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुरगुड, राजश्री शाहू नागरी पतसंस्था मुरगुड, जय शिवराज दूध संस्था मुरगुड, महात्मा फुले दूध संस्था चिमंगाव या संस्थांनी दिली.
या पारितोषिक वितरण समारंभात प्रारंभी स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ. शिवाजी होडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर आभार प्रा.डॉ. ए. जी. मगदूम यांनी मानले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून देवचंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश साळुंखे व कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटीचे मराठीचे प्रा. डॉ. युवराज देवाळे यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी मा. खासदार प्रा. संजय मंडलिक यांची प्रेरणा तर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अॅड. वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह अण्णासाहेब थोरवत यांचे सहकार्य मिळाले या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पारितोषिक वितरण समारंभासाठी डॉ. अद्वैत जोशी, प्रा. पी.एस.सारंग, प्रा. सुरेश दिवाण, प्रा. डॉ. शिवाजी पोवार, प्रा. पी. आर. फराकटे, प्रा. डॉ. सौ माणिक पाटील, प्रा. डी.पी. साळुंखे, प्रा. दादासाहेब सरदेसाई, प्रा. ए. सी. कुंभार, प्रा. सुरज मांगले, प्रा. विठ्ठल कांबळे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.