” शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान “: जिल्ह्यातील तब्बल चोवीस शिक्षक व शिक्षिका गुरुमाऊली पुरस्काराने सन्मानित

राधानगरी प्रतिनिधी : प्रतिश पाटील
“जिथे कमी तिथे आम्ही” या न्यायाने कार्यरत असलेल्या राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान झाले .जिल्ह्यातील तब्बल चोवीस शिक्षक व शिक्षिकाना गुरुमाऊली पुरस्कार देऊन सन्मानित केल्याची माहिती शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर टिपुगडे यांनी दिली . माजी आयुक्त इंद्रजीत देशमुख व माजी शिक्षण संचालक संपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस भागाजे, प्रा. पवन पाटील ,विजयराव मगदूम, सौ जयश्री टिपुगडे, अँड. हेमंत माळी ,अरुण शिंदे नवनाथ टिपुगडे या निवड समितीने या पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षिकांच्या नावाची घोषणा केली .शनिवार दि १८रोजी दुपारी एक वाजता कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी सभागृहात या पुरस्कारांचे विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले .
गुरुमाऊली पुरस्काराचे मानकरी
प्रमोद झावरे,( पेठवडगांव ,) अरविंद मानकर ,(सरवडे) , सौ सुलोचना भागाजे ,( देवाळे ,) कृष्णात बसागरे, (वडगांव) रंगराव गडकर , (मुख्याध्यापक नंदवाळ), जे के चौगले , दशरथ सुतार( वि मं,सावर्डे बु ॥), सौ विद्या चव्हाण (वि म मं सिद्धनेर्ली ), जयदिप डाकरे व प्रविण डाकरे , (भूदरगड), महिपती डावरे , मुख्याध्यापक (राशिवडे खुर्द, )साताप्पा शेरवाडे, (केंद्रशाळा ठिकपूर्ली,) दिगंबर वाईंगडे , (केंद्रशाळा ठिकपुर्ली, )डी पी पाटील, (कोदे खुर्द ), रंगराव बरगे -( केंद्रप्रमुख कौलव,)वैशाली धबाले , (वि मं हलकर्णी), नविन सनगर (श्रीराम हाय कुडित्रे) , शुभांगी पाटील , (डाएट कोल्हापूर) , निशा काजवे (डाएट कोल्हापूर), संजय राबाडे ( कोटेश्वर वि मं कोडोली ) कै . मा .लभित्तम गुरूजी गुरू माऊली पुरस्कार ( धामणीखोरा ) व्ही पी पाटील (वि मं गवशी गावठाण) , स्व श्रीमंत जिन्नाप्पा भागाजे गुरूजी गुरूमाऊली पुरस्कार ( सिमा भाग ) चंद्रकांत खामकर ,(कारदगा)
यशवंत पुरस्काराचे मानकरी
पंकज महाडीक (कोल्हापूर ,)
समाजभान पुरस्काराचे मानकरी
युवक सेवा संघ कोल्हापूर , संवेदना शिक्षक मंच (हातकणंगले ,)
सावली सामाजिक संस्था आजरा.
क्रीडारत्न पुरस्काराचे मानकरी
डॉ केदार साळुंखे , (कोल्हापूर)
जीवनगौरव पुरस्कार
श्री डी एस माळी , माजी शिक्षण विस्तार अधिकारी, कलगी सम्राट शाहीर विठ्ठलराव टिपुगडे, शाहीर नाना ढेरे, आदर्श कृषी अधिकारी शत्रूघ्न पाटील (क//तारळे ), स्वरमाऊली सदाशिव चौगले