ताज्या बातम्यामहाराष्ट्र

केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी ज्ञानू पाटील तर व्हा चेअरमनपदी विष्णू रामजी पाटील यांची बिनविरोध निवड.

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार

पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी ज्ञानू पाटील तर व्हा.चेअरमनपदी विष्णू रामजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धामणी खोऱ्यातील सर्वात जास्त सभासद संख्या व शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल असलेली सेवा संस्था म्हणून वेतवडे तालुका पन्हाळा येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेस ओळखले जाते.

३० एप्रिल १९५४ ची स्थापना असलेल्या या सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या सेवा सोसायटीची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी बाबू महादेव दळवी तर व्हा चेअरमन विष्णु कृष्णा सुतार यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती.

वर्षभरापूर्वी आकस्मिक निधन झालेले संचालक के डी पाटील यांच्या ठिकाणी बिनविरोध म्हणून निवडून आलेले शिवाजी पाटील हे चेअरमनपदी विराजमान झाले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.एम इंगवले सहायक निबंधक श्रेणी १ यांनी काम पाहिले.

नूतन चेअरमन शिवाजी ज्ञानू पाटील व्हा चेअरमन विष्णू रामजी पाटील यांचा माजी चेअरमन बाबू महादेव दळवी, विष्णु कृष्णा सुतार, संचालक जयसिंग पाटील, रघुनाथ पाटील,तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यानंतर ग्रामदैवत श्री जोतिबाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. चेअरमन शिवाजी ज्ञानू पाटील हे दिवंगत संचालक के. डी.पाटील यांचे भाऊ असून ते नेहमी गावातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.

निवडीनंतर जयसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना गेल्या दोन वर्षांत केदारलिंग सेवा संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत यापुढेही आपण सर्वांनी एकत्र राहुन संस्था व शेतकरी हितासाठी काम करुया असे आवाहन केले.

आभार सचिव शंकर डकरे यांनी मानले. यावेळी क्लार्क जीवन सोनार, कर्मचारी राजाराम पाटील ,सर्व संचालक , सभासद व गावातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks