ताज्या बातम्यामहाराष्ट्र

Weather Alert : महाराष्ट्रावर पुढचे ३-४ दिवस अस्मानी संकट, ‘या’ भागांना पावसाचा यलो अलर्ट

मुंबई :

गणेशोत्सवानंतर जोर धरलेल्या मुसळधार पावसाने आता कुठे विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. पण मुंबईसह ठाणे, अहमदनगर, जळगाव आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अशात अनेक भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यादरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढच्या तीन-चार दिवसात विदर्भासह काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह धुवांधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

20/09, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील ३-४ दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची श…

कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार ?

दरम्यान, धुळे शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील देवपूरासह अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. धुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर देवपुरातील लाला सरदार हायस्कूल जवळ असलेल्या सुशीनाला काठावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यातही मंगळवारच्या रात्री ८ वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून लहानमोठ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यातच गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने ते घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले.

महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू होणार…

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आठ ते दहा दिवसानंतर परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. भारतात मोसमी पावसाच्या परतीचे वेध लागले आहेत. हवामान खात्याकडून पुढच्या एक-दोन दिवसांत राजस्थानसह उत्तर भारतामध्ये मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातलं. अशात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामान राहील.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks