ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नंदिनी साळोखेचा  सत्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मुरगूडच्या सरपिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक हरिशश्चंद्र साळोखे यानी नंदिनीच्या निवासस्थानी जाऊन तिचा यथोचित सत्कार केला . या सत्कारप्रसंगी ते म्हणाले वयाच्या ३२ व्या वर्षी नंदिनीने हा मानाचा पुरस्कार मिळवून यश संपादन केले आहे . तिच्या आईनेही प्रतिकूल परस्थितीत तिला साथ दिली आहे .

या दैदित्यमान यशामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासाहेब लवटे , माजी खासदार संजयदादा मंडलिक , आखाडयाचे अध्यक्ष , वस्ताद सुखदेव येरूडकर , अॅड विरेंद्र मंडलिक, आणि वेळोवेळी तिला प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक यांचे या यशामध्ये मोठे योगदान आहे .यावेळी नंदिनीचे त्यानीं तोंडभरून कौतुक करुन शुभेच्छा दिल्या .

या सत्कार प्रसंगी कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक संस्थेचे संचालक महादेवराव साळोखे , शोभा साळोखे , वैशाली साळोखे ,सतीश साळोखे, आदित्य साळोखे , ताई नामदेवराव साळोखे , शुभांगी सतिश साळोखे यांच्यासह मुरगूड मधील नागरीक उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks