शेणगांव ग्रामपंचायत रणधुमाळी 2022 : माजी सरपंच एन. डी. कुंभार गटाचा स्वबळाचा नारा; सुभाष कुंभार यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक धोरणावर लढवणार ग्रामपंचायत निवडणूक.
शनिवार (दि.०५) रोजी माजी सरपंच एन. डी. कुंभार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

गारगोटी प्रतिनिधी :
शेणगांव (ता. भुदरगड) येथील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम या वर्षाअखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्याने आत्तापासून शेणगांव मध्ये विविध राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
काल शनिवार (दि.०५) रोजी माजी सरपंच एन. डी. कुंभार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना माजी सरपंच एन. डी. कुंभार अण्णांच्या कार्याचा व कामाचा लेखाजोखा देत येणारी ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका बैठकीदरम्यान मांडली. विविध गटांसोबत आघाडी केल्यानंतर त्याठिकाणी मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीबद्दल कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे यावेळी कोणासोबत युती-आघाडी न करता ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढवून जिंकण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला.
बैठकी प्रसंगी बोलताना प्रकाश जाबशेट्टी, डॅनी डिसोजा, वसंत कोळी, सागर कुंभार, मोहन कांबळे, संजय कांबळे यांनी युवा नेते सुभाष नामदेव कुंभार यांना पॅनेलचे नेतृत्व देण्याची मागणी करत येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी सर्वांनी सर्व ताकदीनिशी उतरण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी सुभाष कुंभार यांच्या नेतृत्व निवडीला टाळ्यांच्या गजरात सहमती दर्शवली.
सुभाष कुंभार यांचे युवकांमध्ये असलेले आदराचे स्थान व गावातील सर्वच नागरिकांसोबत असलेले स्नेह संबंध यामुळे या निवडणुकीत युवा नेते सुभाष कुंभार यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा मानस कार्यकर्ता बैठकीमध्ये घेण्यात आला.
यावेळी बोलताना सुभाष कुंभार म्हणाले की, आजपर्यंत गावाच्या विकासासाठी माजी सरपंच एन. डी. कुंभार गटाने विविध गट आणि पॅनेल सोबत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आघाडी केली. पण त्या ठिकाणी कुंभार गटाच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचेच काम प्रस्थापितांकडून केले गेले असल्याचे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, गोरगरीब जनतेच्या कामात सक्रिय न राहणाऱ्या व जनतेचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि निवडणुकीपुरता करून घेणाऱ्या गावातील नेत्यांच्या सहवासात न जाता शेणगांव गावातील सर्वच समाजातील व्यक्ती व समूहांना सन्मानाची वागणूक व स्थान मिळवून देण्यासाठी तसेच लोकाभिमुख कारभार चालविण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकासात्मक धोरण ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पॅनलला विजयी करण्यासाठी आजपासून तयारीला लागण्याचे आवाहन केले. त्यासोबत निवडणुकीमध्ये तरुण-तरुणींना जास्तीत जास्त संधी देण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
२७ सप्टेंबर रोजी सुभाष कुंभार यांचा वाढदिवस संपन्न झाला. त्यादिवशी गावातील अनेक नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केले होती. गावातील नागरिकांचे त्यांच्यावर असेलेले प्रेम व विश्वास पाहून आजपर्यंत गावांमधील गरजू-अंध-अपंग-विधवा यांना विविध योजनेखालील जवळपास २० पेक्षा अधिक लोकांची पेन्शन मिळवून देण्याचे काम युवा नेते सुभाष कुंभार यांनी करून निराधार लोकांना आधार देण्याचे कार्य केले आहे.
यावेळी गटाचे नेते माजी सरपंच एन. डी. कुंभार, राजाराम शंकर कुंभार, जयवंत नाईक, प्रकाश जाबशेट्टी, महावीर बोरगावे, गजानन कोळी, नंदकुमार वायचळ, मोहन कांबळे, किरण कुंभार, सागर कुंभार, डॅनी डिसोजा, कृष्णा कांबळे, संतराम कांबळे, क्रांतिसिंह सदलगे, रमेश विभुते, राजेंद्र चराटे, अनिल कोरगावकर, मोहन करवळ, सुनील हाळदे, अतिश घोडके, संजय कांबळे आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सुभाष कुंभार यांच्या कार्याचा तालुक्यात देखील सन्मान…
भुदरगड तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के.पी.पाटील यांनी युवा नेते सुभाष नामदेव कुंभार यांच्यावर सोपवली आहे. या पदाच्या माध्यमातून तालुक्यात काम करण्याची संधी देखील त्यांना प्राप्त झाली आहे.