शाहू साखर कारखाना पूरबाधित ऊस अग्रक्रमाने तोडणार : समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी :
यावर्षी अतिवृष्टी व महापुरामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः नदी काठाशेजारील ऊस पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस बुडालेला आहे. त्यामुळे या ऊस पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालू गळीत हंगामात शाहू साखर कारखाना असा पूरबाधित ऊस अग्रक्रमाने तोडून या शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. अशी घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केली.
कारखान्यामार्फत गळीत हंगाम 2019- 20 व 2020- 21 या दोन हंगामामध्ये घेतलेल्या ऊस पीक स्पर्धा व श्री छत्रपती शाहू शाश्वत ऊस उत्पादन वाढ या योजनेअंतर्गत विजेत्या ऊस उत्पादक स्पर्धकांना बक्षीस वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घेतलेल्या 75 ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना श्री.घाटगे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे ,कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील,सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावर्षीपासून गेट केन विभागातील शेतकऱ्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून बक्षीस देण्यात येणार आहे.
सुरूवातीला राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व शाहू कारखान्याचे संस्थापक स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन श्री.घाटगे यांच्या हस्ते केले.
स्वागत ऊस विकास अधिकारी के.बी.पाटील यांनी केले.संचालक भुपाल पाटील यांनी आभार मानले.
चौकट
यांचे केले विशेष कौतुक
या स्पर्धेतील स्पर्धकांपैकी सागर खोत रा. करनूर यांनी एकरी 134 मेट्रिक टन सरासरीने उच्चांकी ऊस उत्पादन घेत लागण विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.तर लता मारुती तेली या नागाव तालुका करवीर यांनी खोडवा विभागामध्ये एकरी 123 मे.टन सरासरीने उच्चांकी उत्पादन घेतले .या उच्चांकी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे विशेष कौतुक केले.
या स्पर्धेतील विजेत्यांची नावे विभागवार अशी आहेतः
गळीत हंगाम 2019- 20
ऊस पीक स्पर्धा
कागल, कोगनोळी, सांगाव, कुन्नूर सेंटर विभाग :
आडसाली विभाग
धोंडीराम कतगर( सुळकुड), बबन संकेश्वरे (कोगनोळी), रामगोंडा पाटील (आडी)
पूर्वहंगामी विभाग
चंद्रकांत पाटील (सौंदलगा), सतीश चव्हाण (कागल), आकाश तोडकर (कागल)
सुरू/ खोडवा विभाग
धोंडीराम कतगर( सुळकूड), चंद्रकांत माने (कसबा सांगाव ),धीरज मगदूम (कोगनोळी)
करनूर, सिद्धनेर्ली, शेंडूर सेंटर विभाग
आडसाली विभाग
विनायक खोत (व्हन्नूर), बळीराम इंगळे (वंदूर), शंकर मेथे (शेंडूर)
सुरू/ खोडवा विभाग
सागर खोत (करनूर) अमोल खोत (करनूर), शामराव शेंडे (साके),
नंदगाव, इस्पुर्ली, गोकुळ शिरगाव, उचगाव सेंटर विभाग
आडसाली विभाग
दत्तात्रय साठे (नंदगाव), मारुती झांबरे (नंदगाव) अण्णासाहेब पाटील (हलसवडे)
पूर्वहंगामी विभाग
लहू आळवणे (नंदगाव), दत्तात्रय पाटील (दिंडनेर्ली ),सर्जेराव पाटील (नेर्ली),
सुरू /खोडवा विभाग
प्रदीप पाटील (येवती) शंकर पाटील (हलसवडे), अण्णासाहेब पाटील (हलसवडे)
केनवडे, मुरगूड, कापशी अ, कापशी ब ,लिंगनूर कापशी सेंटर विभाग
आडसाली विभाग
शशिकांत करडे (नंद्याळ), केरबा माने (कौलगे) ,साक्षी गायकवाड (चिखली)
पूर्वहंगामी विभाग
निवृत्ती पाटील (बाळेघोल), गणपती कुंभार (अर्जुनवाडा), श्रीपती खोत (आणूर)
सुरू /खोडवा विभाग
रामचंद्र देवडकर (आणूर), गंगुबाई कुंभार (अर्जुनवाडा),राजेंद्र खराडे (शिंदेवाडी)
श्री. छत्रपती शाहू शाश्वत ऊस उत्पादन वाढ योजना
माया पाटील(इस्पुर्ली),अनिल मगदूम (नागाव),ललिता पाटील (नागाव)
गळीत हंगाम 2020 -21
ऊस पीक स्पर्धा
कागल कोगनोळी सांगाव कुन्नूर सेंटर विभाग
आडसाली विभाग
अण्णासो चौगुले (कोगनोळी), अण्णासो रा.चौगुले (कोगनोळी) गोपाळ पाटील (मौजे सांगाव)
पूर्वहंगामी विभाग
शिवगोंडा गायकवाड (हंचिनाळ)
शिवाजी पवार (मत्तीवडे)
बाळू गुरव (कसबा सांगाव)
सुरु /खोडवा विभाग
धोंडीराम कतगर (सुळकुड), बाबासो माने (कागल), कुमार चौगुले (कसबा सांगाव)
करनूर, सिद्धनेर्ली, शेंडूर विभाग
सागर खोत (करनूर) शीतल पाटील (व्हन्नुर )मोहन पाटील (पिंपळगाव खुर्द)
पूर्वहंगामी विभाग
शामराव शेन्डे (साके),बाळासो पाटील (करनूर), दादासो चौगुले (करनूर)
सुरु /खोडवा विभाग
विनायक खोत (व्हन्नूर) शंकर मेथे (शेंडूर ),सागर खोत (करनूर)
नंदगाव इस्पुर्ली, गोकुळ शिरगाव, उचगाव सेंटर विभाग
आडसाली विभाग
शिवाजी रानगे (दिंडनेर्ली), आप्पासो मगदूम (हलसवडे), मारुती तेली (नागाव )
पूर्वहंगामी विभाग
उमेश पाटील (हलसवडे), बाबुराव पाटील (गोकुळ शिरगाव),मारुती कासोटे (उचगाव)
सुरु खोडवा विभाग
लता तेली (नागाव), सूर्यकांत खटाळे (पुलाची शिरोली) सपना नाईक (नागाव)
केनवडे, मुरगूड, कापशी अ, कापशी ब ,लिंगनूर कापशी सेंटर विभाग
आडसाली विभाग
सुरेश पाटील (चिखली ),
लक्ष्मी डाफळे (सावर्डे खुर्द), विठ्ठल भोसले (सावर्डे बुद्रुक),
पूर्वहंगामी विभाग
धनाजी पाटील (बाळेघोल),
विजय गौड(नंद्याळ) दत्तात्रय सूर्यवंशी (पिंपळगाव बुद्रुक)
सुरु /खोडवा विभाग
शशिकांत करडे (नंद्याळ), शिवराम चौगुले (म्हाकवे), सुनील पसारे (आलाबाद)
श्री छत्रपती शाहू शाश्वत ऊस उत्पादन वाढ योजना विभाग
श्रीपती तोडकर (द-याचे वडगाव) इंदुबाई फासके (एकोंडी) रेखा ढेरे (कणेरी)