ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुयोग्य नियोजन, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठबळामुळेच शाहूने यशाची नवनवीन शिखरे पार केली : राजे समरजितसिंह घाटगे ; उच्चांकी ऊस गळीत, साखर व स्पिरीट उत्पादनाबद्दल कारखाना कार्यस्थळावर आनंद सोहळा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सुयोग्य नियोजन, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठबळामुळेच शाहूने यशाची नवनवीन शिखरे पार केली असे प्रतिपादन या ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये शाहू साखर कारखान्याने उच्चांकी ऊस गळीत, साखर व स्पिरीट उत्पादन केल्याबद्दल आयोजित आनंद सोहळा कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे होत्या.

यावेळी शाहू साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या उच्चांकी साखर पोत्यांचे पूजन केले. जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनधारकांचा सत्कार केला.
श्री घाटगे पुढे म्हणाले,साखर कारखानदारी मध्ये केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न रहाता इतर आर्थिक पर्याय शोधावे लागणार आहेत.त्यासाठी उपपदार्थ निर्मिती शिवाय पर्याय राहणार नाही. हे कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी दहा वर्षांपूर्वीच जाणले होते. त्यानुसार उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांना प्राधान्य दिले. आपण त्यामध्ये यशस्वी झालो हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी ते असायला हवे होते.
कारखान्याने बेचाळीस वर्षांमध्ये यशाची नव- नवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत याला केवळ साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे व्यवस्थापन कौशल्य , त्याला प्रशासनाचे योग्य नियोजन व कर्मचाऱ्यांना दिलेली साथ हेच कारणीभूत आहे.कारखाना व्यवस्थापण व प्रशासन त्यांचेच अनुकरण करीत आहे.

आपल्या प्रास्ताविकात हंगामाचा आढावा घेताना कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले,शाहू साखर कारखान्यासाठी गळीत हंगाम 2021- 22 ऐतिहासिक ठरला.या हंगामात कारखान्याने गळीतचा नवा विक्रम नोंदवला.या गळीत हंगामामध्ये 10 लाख 77 हजार 548 मेट्रिक टन उसाचे गाळप तर 12 लाख 32 हजार 450 मेट्रिक टन साखर उत्पादन केले आहे. तसेच 92.5 लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली असून साडेसहा कोटी युनिट वीज निर्मिती केली आहे. शाहू ने नव्याने तयार केलेल्या शाहु समृद्ध खतास सभासदाची चांगली मागणी आहे.

यावेळी कारखान्याचे सेक्रेटरी एस ए कांबळे, बाळासाहेब तिवारी बाळासो हेगडे यांनीही मनोगत व्यक्त केले

स्वागत कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनी केले. प्रास्तविक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले, युवराज पाटील यांनी आभार मानले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत मृगेन्द्रसिंह घाटगे श्रीमंत सौ नंदितादेवी घाटगे,श्रीमंत सौ . नवोदिता घाटगे श्रीमंत वीरेंद्रसिंह घाटगे श्रीमंत सौ. श्रेयादेवी घाटगे श्रीमंत मालोजीराजे घाटगे,श्रीमंत यशराज घाटगे यांच्यासह उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कारखान्याचे सर्व संचालक, बाबासाहेब पाटील, भुषण पाटील आदी उपस्थित होते.

स्व .राजेसाहेब यांना अभिप्रेत असणारे यश

जेष्ठ संचालक वीरकुमार पाटील म्हणाले,मी कारखाना वाटचालीचा सुरवातीपासूनचा साक्षीदार आहे.
स्व. राजे साहेब यांच्या पश्चात समरजितसिंह राजेनी कारखाना उत्तम चालवला. शाहू सुरू झाला त्यावेळी कागल तालुक्यात एकच कारखाना होता. परंतु आज कागल तालुक्यामध्ये पाच कारखाने आहेत. तरीही स्पेर्धेच्या युगात आपण उच्यांकी गाळपासह नवनवीन यशाची शिखरे पार करतो हे संस्थापक स्व. राजेसाहेब यांना अभिप्रेत असणारे यश आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks