ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शारीरिक,मानसिक आणि भावनिक आरोग्य टिकवण्यासाठी सप्तचक्र संतुलन आवश्यक – मेघाताई बांभोरीकर

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शारीरिक,मानसिक आणि भावनिक आरोग्य टिकवण्यासाठी सप्तचक्र संतुलन आवश्यक आहे.असे प्रतिपादन मेघाताई बांभोरीकर यांनी केले.

येथे श्रीराम मंदिर जिर्णोद्धार समिती, कागल यांच्या वतीने महिलांसाठी ‘सप्तचक्र आणि त्यांचे संतुलन’या विषयावर आयोजित विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानवेळी त्या बोलत होत्या.

या शिबिराचे आयोजन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमाती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेघाताई बांभोरीकर पुढे म्हणाल्या, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मुख्य सात ऊर्जाकेंद्रांना सप्तचक्र म्हणतात. शरीराच्या गरजेप्रमाणे वातावरणातील निसर्गशक्ती आभामंडलात आकर्षली जाते आणि चक्रांच्या क्षमतेप्रमाणे तिचे ग्रहण केले जाते.शरीराभोवती असणाऱ्या सूक्ष्म देहाच्या आवरणातील ऊर्जावहन करणाऱ्या असंख्य नाड्या निसर्गातील पंचप्राणांचे सतत वहन करतात. या पंचतत्त्वांची ऊर्जा विविध चक्रांवर संकलित होते आणि प्रत्येक चक्र विशिष्ट तत्त्वावर प्रक्रिया करून ते संपूर्ण शरीराला पुरविते.

राजे बँकेच्या अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे म्हणाल्या, राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासह महिलांच्या आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवीत आहोत. कौटुंबिक पातळीवर महिला विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात अशावेळी सप्तचक्रांविषयीची माहिती त्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त मार्गदर्शन

या व्याख्यानात घरातील सकारात्मक-नकारात्मक ऊर्जा ओळखणे, नकारात्मकता कमी करण्यासाठी मंत्र, स्तोत्र वाचन यांचे महत्त्व, तसेच निरोगी जीवनशैलीसाठी सोप्या दैनंदिन पद्धतींचा ऊहापोह करण्यात आला. संस्कृतीमय व आनंदी कुटुंब घडवण्यासाठी उपयुक्त असा दैनंदिन तक्ता देखील उपस्थितांना समजावून सांगितला गेला. दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अशा बारीक-सारीक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले त्यामुळे उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks