उत्साळी येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्व. विश्वासराव देसाई.

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
उत्साळी ता.चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक व आजरा तहसील चे निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांचे वडील विश्वासराव नानासो देसाई वय 95 वर्ष पूर्ण यांचे मंगळवार दि.3ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 4 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचा अल्प परिचय थोडक्यात,स्व. विश्वासराव देसाई यांचे शिक्षण जुनी 10 वी पर्यंत झाले होते. ब्रिटिश काळात खानापूर कर्नाटक येथील तहसील कार्यालयात त्यांनी लिपिक पदी सेवा बजावली होती मात्र काही घरगुती अडचणीमुळे त्यांनी सदर सेवेला पूर्णविराम दिला व गावी राहून उत्तम पद्धतीने शेती केली. शेती व्यवसायाची त्यांना खूप आवड होती .त्यांचा स्वभाव साधा,मनमिळावू व प्रेमळ असा होता.त्यांचे संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित असून त्यांचे जावई अरुण विचारे कोल्हापूर हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता आहेत. त्यांच्या पश्चात मुलगी सौ.अंजली अरुण विचारे कोल्हापूर,मुले अनिल(ग्रंथपाल रेंदाळ हायस्कुल), म्हाळसाकांत(निवासी नायब तहसीलदार आजरा तहसील), नातू खंडेराव देसाई (माजी उपसरपंच ग्रा.पं.उत्साळी) सुना व नातवंडे असा परिवार आहे.
🌸 ऋणनिर्देश 🌸
आमचे वडील आणि ब्रिटिश काळात खानापूर (कर्नाटक) येथील तहसील कार्यालयात लिपिक म्हणून सेवा बजावलेले कै.विश्वासराव नानासो देसाई,वय -95 वर्षे यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.अतिशय प्रेमळ, मनमिळावू,साधा व निरागस स्वभावाचे होते. त्यांनी नोकरीचा राजीनामा देवून आपल्या गावी उत्तम शेती केली.अशा सुस्वभावी व्यक्तिमत्वाच्या निधनाने आमच्या कुटुंबात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. अशा दु:खद प्रसंगी मित्र, आप्तेष्ट नातेवाईक, हितचिंतक,सामाजिक , शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील लहान -थोरांनी आम्हा देसाई कुटुंबियांचे प्रत्यक्ष भेटून, फोन द्वारे,व्हॉटस् अप, फेसबुक अशा माध्यमातून सांत्वन केलात,धीर दिलात, यांबद्दल आपले आम्ही देसाई कुटुंबियांमार्फत ऋणी आहोत.