ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेनापती कापशी खोऱ्यामध्ये राजे समजतसिंह घाटगे गटाला भगदाड

कापशी प्रतिनिधी : 

बालेघोळ ता. कागल येथील भाजप जिल्हा चिटणीस व संजयगांधी निराधार समिती सदस्य तानाजी कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली बाळेघोल मधील १०० पेक्षा अधिक सक्रिय कार्यकर्त्यानी समरजितसिंह घाटगे गटातून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य रमेश विठ्ठल पोवार, पप्पूचंद पोवार, सुरज यादव, अनिल गावसकर, प्रवीण पोवार, वैभव डावरे, विशाल यादव यांच्यासह दूध संस्थांचे संचालक व हिंदुत्ववादी विचाराच्या मंडळांचे शेकडो पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमास जिल्हा चिटणीस संजय गांधी निराधार समिती सदस्य तानाजी कुरणे, कागल तालुका अध्यक्ष एकनाथ पाटील, मुरगुड मंडल अध्यक्ष अमर पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मयूर सावर्डेकर, स्टार्ट अप इंडिया तालुकाध्यक्ष रोहन पाटील व युवा कार्यकर्ते आकाश पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks