माधुरीला परत आणण्यासाठी गडहिंग्लज मध्ये आत्मक्लेश आंदोलन

गडहिंग्लज प्रतिनिधी: राजेंद्र यादव
नांदणी मठ ता. शिरोळ येथील माधुरी उर्फ माधवी ही हत्तीन गेली सातत्याने 35 वर्षे सेवेत आहे या हत्तींनीला पेठा या संस्थेने गुजरात मधील वनतारा जामनगर या ठिकाणी नेले.त्यामुळे संपूर्ण राज्यातील जैन धर्मियांचे सह इतर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने आज गडहिंग्लज मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला.
आमच्या माधुरीला पुन्हा मठात आणून सोडावे ,” आमची माधवी आम्हाला पाहिजे” अशी मागणी आज या मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली. या मोर्चाची सुरुवात जैन मंदिर पिराजी पेठपासून बाजारपेठ मार्गे सुरू झाला . हा मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून थेट गडहिंग्लज प्रांत कार्यालयाजवळ नेण्यात आला.
यावेळी मोर्चाला परम पूज्य 108 मुनिश्री विदेह सागर जी महाराज यांनी उपस्थित राहून आपली या हत्तींनी बद्दल असणारी तळमळ सरकारचा निषेध करत व्यक्त केली.यावेळी सर्व समाजातील नागरिकांनी विविध पक्षाच्या ,संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना विविध शब्दांत मांडल्या .तसेच 15 ऑगस्ट पूर्वी आमची माधुरी हत्तीण आम्हाला परत मिळावी अशी मागणी केली.
प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना माधुरी हत्तींनीला परत आणण्यासाठी चे निवेदन देण्यात आले. यावेळी गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील जैन धर्मीयांच्या सह विविध पक्षाचे कार्यकर्ते सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मोर्चा मुळे काही काळ शहरातील वाहतुकीची कोंडी झाली.या मोर्चा मध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.