ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बचत गट,अंगणवाडी सेविकांसह आशा स्वयंसेविका सेवाव्रतींचा राजे फौंडेशनच्या पुरस्कारातून सन्मान ; राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांनी केली पुरस्कारांची घोषणा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे 

सामाजिक बांधिलकी,सेवा आणि समर्पणाच्या भावनेने कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका तसेच महिला बचत गटांचा यथोचित सन्मान करण्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यातर्फे “राजे विक्रमसिंह घाटगे पुरस्कार” जाहीर करण्यात आले.

शाहू उद्योग समूहाचे संस्थापक आणि सहकार चळवळीचे अभ्यासू, द्रष्टे नेतृत्व स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७व्या जयंतीचे औचित्य साधून पुरस्कारांची अधिकृत घोषणा राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदितादेवी घाटगे यांनी केली.

पुरस्कार वितरणामागचा उद्देश समाजातील निरपेक्ष सेवा देणाऱ्या घटकांचा गौरव करणे व त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी हा आहे. या उपक्रमाची संकल्पना शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांची असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

कागल, करवीर, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि महिला बचत गटातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि कोल्हापुरी फेटा असे असून, पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच निश्चित करण्यात येणार असून, त्याची तारीख व ठिकाण संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

पुरस्कारार्थींची यादी विभागानिहाय खालीलप्रमाणे :

अंगणवाडी सेविका विभाग :

सुनीता परीट (एकोंडी), वनिता शिंदे (व्हन्नूर), सुनीता पाटील (सांगाव), सुनीता पाटील (करनूर), संगीता परीट (बानगे), नीलिमा शिंदे (बामणी), अलका फराकटे (फराकटेवाडी), आनंदी पाटील (साके), साधना पाटील (भडगाव), सविता पाटील (बेलवळे खुर्द), जयश्री पाटील (बाचणी), सुनंदा सुतार (हळदी), सुजाता मुळे (सोनगे), शोभा कोंडेकर (यमगे), अनिता चौगुले (अर्जुनी), कुसुम मोरे (वडगाव कापशी), मंगल लोहार (कडगाव), सरोजिनी इंगळे (बड्याचीवाडी), लक्ष्मी मरीनाईक(गिजवणे), विजयमाला मोरे (वडरगे), शशिकला पाटील (महागोंड), कल्याणी पाटील,अश्विनी काळे (दोघीही कागल), स्मिता जाधव, वंदना क्षीरसागर (दोघीही मुरगुड),संगीता जाधव (उत्तूर), शितल खोत (गडहिंग्लज), बबीता पाटील (नागाव), सुनिता मोरे (कणेरीवाडी),स्नेहल डफळे (सोनाळी)

आशा स्वयंसेविका विभाग :

रोहिणी कुंभार (लिंगनुर दु.), माधुरी पाटील (पिंपळगाव खुर्द), सुरेखा लोहार (सावर्डे खुर्द), गीता माने (बोरवडे), कविता पाटील (निढोरी), जयश्री काळुगडे (बेनिक्रे), आशा कस्तुरे (चिखली), शितल पाटील (कौलगे), सोनाली उपलाने (अवचितवाडी), वैशाली पाटील (बेलेवाडी काळम्मा), तेजश्री रणवरे (कडगाव), गीता निऊंगरे (जाधेवाडी), आक्काताई पाटील (उत्तूर), जानकी गवळी (नेर्ली), त्रिवेणी मगदूम (हळदी), सारिका तिप्पे (तमनाकवाडा)

महिला बचत गट विभाग :

मानिनी (व्हन्नूर), जनाबाई (पिंपळगाव खुर्द), सखी (करनूर), जीविका (वंदूर), राजमाता (गोरंबे), नवजीवन, संघर्ष (दोन्हीही सावर्डे बुद्रुक), राधेकृष्ण, संत बाळूमामा (दोन्हीही भडगाव), समता (बाचणी), श्री आदर्श(बाळीक्रे), केदारलिंग (कडगाव), जिजामाता (करंबळी), रमाई (मासेवाडी), हरिप्रिया, रिद्धी-सिद्धी, श्री साई, शाकंभरी (सर्व कागल), नवबौद्ध (मुरगुड), अंबिका (गडहिंग्लज), सक्षम (कणेरी), भाग्यलक्ष्मी (चिमगाव).

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks