ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोवाड येथील दोन खेळाडूंची निवड

नेसरी प्रतिनिधी :
कल्याण मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ओपन रग्बी शिबिरातून वल्लभ पाटिल आणि श्रीधर निगडे या दोन खेळाडूंची पटणा बिहार येथे दि.13 ते 16 जुन रोजी होणाऱ्या आखिल भारतीय ओपन रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा संघाचे प्रशिक्षक आणि सचिव दिपक पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले . सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे , सचिव एम. व्ही. पाटिल आणि सर्व संस्थेचे संचालक, प्राचार्य. डॉ. व्ही. आर. पाटिल, आर्टस, कॉमर्स, सायन्स आणि बी. सी. ए. चा स्टाफ तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य आणि प्रा.आर. टी. पाटिल शारीरिक शिक्षण संचालक याचे मार्गदर्शन लाभले.