बिद्रीच्या उपसरपंचपदी मंडलिक गटाच्या सागर कांबळे यांची निवड

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके :
बिद्री येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माजी खासदार संजय मंडलीक गटाचे सागर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुजा पाटील होत्या. उपसरपंच आनंदा पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युलानुसार उपसरपंचपदी सागर कांबळे यांची निवड झाली.निवडीनंतर मंडलिक गटाच्या समर्थकांनी गुलालाची व फटाक्याची आतिषबाजी केली.
बिद्री ग्रामपंचायतीची २०२१ साली निवडणुक झाली होती. त्यावेळी आम. हसन मुश्रीफ व माजी खास. संजय मंडलीक यांनी एकत्र येत ग्रामपंचायतीत बहुमत मिळवले होते. स्थानिक नेत्यांनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार आज उपसरपंचपदी मंडलिक गटाच्या सागर कांबळे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उपसरपंच कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच पुजा पाटील, मंडल अधिकारी माधव व्हरकट, माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, विद्यमान सदस्य अशोक ऊर्फ अण्णासो पोवार, पांडुरंग चौगले, आनंदा पाटील, शोभा चौगले, शितल गायकवाड, सुशांत चौगले, शोभाताई पाटील, सुलोचना पाटील, राजेंद्र चौगले आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक ग्रामविकास अधिकारी बी. के. कांबळे यांनी केले तर आभार शहाजी गायकवाड यांनी मानले.