प्रदूम्न्य चौगुले याची (एन. डी. ए.) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी साठी निवड.

गडहिंग्लज :
हरळी खुर्द (तालुका : गडहिंग्लज) येथील प्रदूम्न्य शशीकांत चौगुले याची (एन डी ए) राष्ट्रीय सौरक्षण प्रबोधिनी साठी निवड झाली असून पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यांचे वडील शशिकांत चौगले हे सैन्यातून नायब सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झाले असून आता विमा सल्लागार आहेत, आई सौ अनिता शशिकांत चौगुले या प्राथमिक शिक्षिका आहेत. बहीण श्रुतिका शशिकांत चौगुले व काका श्री बबन गणपती चौगुले माजी सैनिक यांचे प्रदूम्न्य ला विशेष सहकार्य लाभले. असून त्याचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर इंचनाळ येथे झाले तर माध्यमिक शिक्षण हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द व शिवाजी विद्यालय महागाव येथे झाले आहे. तर उच्च माध्यमिक डिफेन्स सर्व्हिस अकॅडमी शहापूर भंडारा येथे झाले आहे. गावातील शाळेत शिकून सुद्धा उत्तुंग शिखर गाठता येते हे प्रदूमन्य ने सिद्ध करून दाखवले आहे.