ताज्या बातम्यामहाराष्ट्र
दिपक सोनाळकर यांची कोजिमाशि पत संस्था भोगावती शाखा सल्लागार पदी निवड

कौलव प्रतिनिधी :
कौलव ता. राधानगरी येथील कौलव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे सहायक शिक्षक दिपक सोनाळकर सर यांची शिक्षक नेते दादासाहेब लाड सर यांच्या नेतृत्वाखाली असणार्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या भोगावती कारखाना शाखेच्या सल्लागार पदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांची निवड ही शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कामामुळे झाली आहे. या निवडीकामी त्यांना कौलव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या सहकारी स्टाफचे सहकार्य लाभले आहे.