ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नवोदय साठी नेसरीच्या ११ विद्यार्थ्यांची निवड

गडहिंग्लज प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
जवाहर नवोदय विद्यालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२०-२१ च्या प्रवेश परीक्षेत श्री क्लासेस तळेवाडी तालुका गडहिंग्लज येथील तब्बल २० पैकी ११ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.क्लासेस चा एवढं उच्चांकी निकाल लागल्यामुळे मार्गदर्शक काटाळे सर व टीम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.श्री क्लासेस चे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- श्रावणी निवगिरे शौर्य कोकितकर,पृथ्वीराज गुरव,ज्ञानेश्वरी देसाई,ओमकार मोरे,रोहीत गोरुले,अनिकेत पाटील,व्यंकटेश धुरी,अनघा कांबळे, अनुज कांबळे,विराज नाईक.तसेच काटाळे सर, पाटिल मॅडम व देसाई मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.