सावर्डेतील बालविवाह प्रकरणी ९ जणांवर मुरगूड पोलीसांत गुन्हा दाखल.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील सावर्डे बु.येथील साताप्पा सदाशिव पौंडकर याचा लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील एका अल्पवयीन मुलीशी विवाह लावण्यात आला.बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार या प्रकरणी नऊ जणाविरुध्द मुरगूड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद ग्रामसेवक लक्ष्मण पाटील यांनी दिली आहे.
पोलीसांतून मिळालेली माहिती अशी,२२ ऑगस्ट २०२२ रोजी सौंदण जि.अहमदनगर येथे सावर्डे बुद्रक ( ता. कागल ) येथील साताप्पा सदाशिव पौडकर या युवकाचा मुरुड ( जि. लातूर ) येथील एका पीडीत मुलीशी विवाह झाला होता.हा विवाह लावण्यासाठी राणी बापू कसबे(आई),बापू शिंदे (काका),आकाश बापू कसबे (भाऊ),सर्व रा.दत्तनगर,मुरुड,ता.मुरुड जि.लातूर,सुरेखा बापू सूर्यवंशी (मावशी), पुजा बापू शिंदे (मावशी),भरत विठ्ठल पाटील,(आरळे, ता. करवीर ) व सासरा सदाशिव पौंडकर यांनी यशस्वी मध्यस्थी केली.त्यामुळे हा विवाह झाला.पण
गेली महिनाभर पती सातापा,सासरा सदाशिव पौंडकर व चंद्रे,(ता.राधानगरी ) येथील नणंदेची मुलगी वर्षा नामदेव पाटील हे सर्वजन पीडीत मुलीस घरातील कामे करता येत नाहीत, जेवण बनवता येत नाही,शेतातील कामे येत नाहीत.अशी कारणे सांगून मारहाण करत होते.ही बाब निदर्शनास येताच सावर्डे बु चे ग्रामसेवक लक्ष्मण मारुती पाटील (रा.यमगे,ता. कागल ) यांनी वरील नऊ जणाविरुध्द बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार मुरगूड पोलीसात फिर्याद दिली.त्यानुसार त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.