ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आदमापुर गावाजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार

बिद्री प्रतिनिधी :
निपाणी – राधानगरी राज्यमार्गावर आदमापुर गावाजवळील एच. पी.पेट्रोल पंपासमोर मोटरसायकल आणि केमिकल घेऊन जाणारा टँकर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पांडुरंग गणपती ढेकळे (वय ५७ )रा. आर के नगर, कोल्हापूर. हे ठार झाले अपघाताची नोंद भुदरगड पोलिस ठाण्यात झाली आहे.
मयत ढेकळे आदमापूर येथे बाळुमामांच्या दर्शनासाठी मोटरसायकलवरून चालले होते. ते पेट्रोल पंपाजवळ आले असता निपाणीकडे चाललेल्या एच आर ३८ डब्ल्यू ९२५६ या केमिकल घेवून चाललेल्या टँकरच्या पुढील चाकाखाली सापडले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सुरेंद्र सिंग रामजी ठाकूर ( वय २४)या उतरप्रदेशच्या टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.