ताज्या बातम्या

संत सेवालाल यांचे कार्य समाजातील अनिष्ट रूढी परंपरेला छेद देणारे होते. प्राचार्य डॉ. संजय पाटील

बिद्री (प्रतिनिधी : अक्षय घोडके) :

संत सेवालाल यांनी समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा जपल्या जात होत्या त्याला त्यांनी विरोध केला .अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले .संत सेवालाल हे संत नामदेव आणि संत कबीर यांच्या विचाराचे अनुयायी होते .त्यामुळे त्यांनी त्या विचाराचा प्रसार त्यांच्या पश्चात केल्यामुळे त्यांना संत ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. बंजारा समाजातील ते असल्यामुळे त्यांना निम्न दर्जाची वागणूक मिळत होती.पण त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरेला छेद देण्याचे क्रांतिकारी कार्य त्यांनी केले .असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केले. दूधसाखर महाविद्यालयात हिंदी विभाग आयोजित संत सेवालाल जयंती कार्यक्रमात ते संत सेवालाल यांच्या प्रतिमा पूजन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.स्वागत प्रा.डॉ.एस.बी. देसाई यांनी तर प्रास्ताविक प्रा. सौ. सुहानी पाटील यांनी केले. आभार डॉ. लक्ष्मण करपे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


दूधसाखर मध्ये संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील,हिंदी विभागप्रमुख डॉ.एस.बी. देसाई व इतर.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks