ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीय

Sanjay Pawar Vs Dhananjay Mahadik: Rajya Sabha votes:पहिल्याच फटक्यात पहिली पसंती, संजय पवारांचा विजय जवळपास निश्चित, गणित नेमकं काय?

Rajya Sabha Election 2022 : 

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत 281 आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान केले आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांपैकी पाच जागांचं चित्र स्पष्ट असलं तरी सहाव्या जागेची चुरस आहे. या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक (Sanjay Pawar vs Dhananjay Mahadik) यांच्यात लढत आहे. मात्र या लढतील राज्यसभा उमेदवार संजय पवार पहिल्या पसंतीच्या मतांनं विजयी होतील महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांना विश्वास आहे. 

साधारणत: संजय पवार विजयी होऊ शकतात असं सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येतंय. 

पहिल्या पसंतीची मतं 

शिवसेना – 13 
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी – 9
माकप – 1
शेकाप – 1
शंकरराव गडाख – 1 
बच्चू कडू (प्रहार) – 2
स्वाभिमानी – 1
सपा – 2 
एमआयएम – 2 

अपक्षः- 9
मंजुळा गावित 
गीता जैन 
राजेंद्र यड्राव्हकर 
आशिष जैस्वाल 
चंद्रकांत पाटील 
नरेंद्र भोंडेकर 
विनोद अग्रवाल 
किशोर जोरगेवार 
संजय मामा शिंदे

कोण आहेत संजय पवार?

शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चि      म महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks