कौलगे येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय कांबळे यांचा सत्कार

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कौलगे येथील समस्त मंडलिक प्रेमी ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य व खासदार संजय दादा मंडलिक यांचे विश्वासू व जवळचे कार्यकर्ते व महालक्ष्मी हायस्कूल लिंगनुर येथील शिक्षक संजय कांबळे यांना नुकताच राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन यांच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच व तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय भोसले हे होते. तर उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक लोकनेते सदाशिवराव मंडलिक कारखाना संचालक व सामाजिक कार्यकर्ते तानाजी सातपुते यांनी केले.
यावेळी त्यांनी बोलताना संजय कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वांचे वतीने अभिनंदन केले. यावेळी सत्कार करताना राजू पाटील, सागर पाटील, माजी. जि .प .सदस्य हिंदुराव कांबळे गजानन सातपुते, संभाजी पाटील फौजी, बजरंग पाटीरल फौजी, संजय साबळे, अशोक डवरी ,युवराज पाटील , सुनिल साबळे इत्यादी मान्यवर हजर होते. यावेळी सत्कारमूर्ती संजय कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.