संदिप बोटे कार्य खूप कौतुकास्पद : स. पो. नि. कुमार ढेरे ; स्वराज्य निर्माण संस्थेमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित कडबा कुट्टी मशीन वाटप

मुरगूड प्रतिनिधी :विजय मोरबाळे
स्वराज्य निर्माण चे संस्थापक संदिप बोटे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानित कडबा कुट्टी मशीन वाटप करण्यात आली. मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा. कुमार ढेरे यांच्या हस्ते व महाराष्ट्र एन. जी. ओ समितीचे राज्याध्यक्ष्य मा. युवराज येडूरे, संजय गांधी निराधार समिती कागल चे माजी सदस्य मा. प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना कुमार ढेरे यांनी संदिप बोटे ग्रामीण भागातील लोकांसाठी जे कार्य करत आहेत ते खूपच कौतुकास्पद असल्याच सांगितलं.स्वराज्य निर्माण च्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक, कला, क्रीडा , सांस्कृतिक, महिला सबलीकरण यावर कार्य चालू आहे. कोरोना महामारीत तर खूपच उल्लेखनीय असं काम स्वराज्य निर्माण च्या माध्यमातून संदिप बोटे यांनी केले आहे .. स्वराज्य निर्माण चे संस्थापक संदिप बोटे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य निर्माण कोल्हापूर जिल्ह्यात काम करत आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास 150 हुन अधिक शिलाई मशीन, याबरोबरच महिलांना व्यवसाय मार्गदर्शन, प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरु करण्यास मदत केली आहे. शासकीय योजनेतून शेतकऱ्यांना, महिलांना लोन मिळवून दिले आहे.सभासद महिलांना प्रशिक्षण वेगवेगळ्या स्पर्धा, सभासदांच्या ग्रामीण भागातील मलामुलींसाठीहीं स्पर्धा घेतल्या जातात. कार्यक्रमाचे स्वागत स्वराज्य निर्माण संस्थापक संदिप बोटे यांनी केले. प्रास्ताविक विकास सावंत यांनी केले यावेळी चिकोत्रा जन आंदोलन समिती अध्यक्ष ऍड.दयानंद पाटील ,युवासेना तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, राम अग्रो चे उद्योजक स्वप्नील देसाई, बालमुकुंद पोवार लिंगनूर,
निकाल न्युजचे कार्यकारी संपादक विजय मोरबाळे , जिल्हा व्यसनमुक्ती सदस्य विश्वनाथ कोरे,जयवंत साळोखे, लक्ष्मण माळी,संदिप भारमल, सागर कुरणे व लाभार्थी उपस्थित होते.लवकरच ग्रामीण भागातील महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करणार असल्याचे सांगून महिला युवक, शेतकरी यांनी स्वराज्य निर्माण ला संपर्क साधण्याचे आवाहन संस्थापक संदिप बोटे यांनी केले. यावेळी आभार आकाश पाटोळे यांनी मानले