ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरीच्या नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी संदीप कांबळे यांची नियुक्ती

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नेसरी पोलीस ठाण्यातील सपोनि प्रशांत पाटील यांची बदली झालेने नूतन सपोनि संदीप कांबळे यांनी नेसरी पोलीस ठाणेकडे पदभार स्वीकारला आहे.
याआधी पुणे,नाशिक,कोल्हापूर येथे उलेखनिय अशी सेवा बजावलेल्या सपोनि संदीप कांबळे यांनी नेसरी कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवणार असल्याचे सांगितले .तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे देखील ते म्हणाले.