ताज्या बातम्या
आवळी बुद्रुकला जोतिर्लिग फौंडेशन मार्फत आर्सेनिक अल्बम गोळ्यां वाटप

कुडुत्री प्रतिनिधी :
आवळी बुद्रुक ता राधानगरी येथील जोतिर्लिंग फौंडेशन आवळी बुद्रुक या सामाजिक संस्थेच्या वतीने आवळी बुद्रुक येथे आर्सेनिक अल्बम गोळयां वाटप करण्यात आल्या या संस्थेने कोरोना काळात गोरगरीब गरजूं लोकांना जीवनावश्यक किराणा ‘ अन्नधान्य व भाजीपाला किट ,मास्क . सॅनिटायझर आदी वाटप केले कोरोना काळात उत्लेखनिय काम करणारे दोन शे एक व्यक्तीचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांच्या गौरव केला त्यांनी आजपर्यंत मोफत श्रवणयंत्र , वृक्षारोपन , अशी विविध तीस हुन अधिक सामाजिक उपक्रम राबवून संस्थेने छाप निर्माण केली आहे ‘ यावेळी फौंडेशन अध्यक्ष संदीप टिपुगडे , स्वप्निल परिट ‘ सागर कवडे , सर्जेराव पाटील , दिलीप गुरव , धनाजी परिट , साताप्पा चौगले संदीप पाटील दत्ता पाटील , कुमार पाटील ,आदी उपस्थित होते.