कागलच्या श्री लक्ष्मी टेकडी येथील उड्डाणपुलास मंजुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्जीतसिंह घाटगे यांनी मानले आभार कागल शहराजवळ एस.टी.बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेला अरुंद पूल मोठा होणार

कागल, प्रतिनिधी. :
कागल- सातारा राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण चे काम पूर्ण करणेची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये कागलच्या श्री लक्ष्मी टेकडी जवळ उड्डाणपूल उभा करणेबाबत व राष्ट्रीय महामार्गावर कागल शहराजवळ एस.टी.बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेला पूल अतिशय लहान आहे.तो मोठा करावा याबाबतचे निवेदन मार्च महिन्यात राजे समर्जीतसिंह घाटगे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिले होते.
श्री घाटगे हे सातत्याने या कामाचा पाठपुरावा करीत होते . यास यश आले असून त्यांच्या सततच्या मागणीचा विचार करून होऊ घातलेल्या कागल – सातारा सहापदरीकर कामाच्या वेळी हा उड्डाणपूल बांधनेस व राष्ट्रीय महामार्गावर व कागल शहराजवळ एस.टी.बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेला पूल मोठा करणेस मंजुरी दिली असून त्याची खर्चात तरतुद केली असलेचे श्री घाटगे यांना श्री नितिन गडकरी यांनी पत्राद्वारे कळविले होते या कृतधनेपोटी आज दिल्ली येथे ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन आभार मानले.