ताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हन्नूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त समरजितसिंह घाटगे यांनी केले अभिवादन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे 

व्हन्नुर (ता.कागल) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी स्वरूपा हजारे,योगिता निकम, वैष्णवी निकम यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला.

कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील,सचिन मगदूम,दलितमित्र एकनाथराव देशमुख,राजे बँकेचे संचालक अमोल शिवई,माजी सरपंच सु-याप्पा बोराटे, महावीर अष्टेकर,गणपती हजारे,लक्ष्मण हजारे, शिवाजी निकम,संभाजी संकपाळ,संदीप लोंढे आदी उपस्थित होते.भाऊसाहेब बोराटे यांनी स्वागत केले. संदीप बेळगे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks