मुरगूड येथील श्री व्यापारी नागरी पतसंस्थेला ७० लाखांचा नफा : सभापती किरण गवाणकर यांची माहिती

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील रौप्यमहोत्सवी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला ७० लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती सभापती किरण गवाणकर यांनी दिली.
ते म्हणाले, संस्थेची सांपत्तिक स्थिती भक्कम असून, वसूल भाग भांडवल ४१ लाख १६ हजार, ठेवी २० कोटी ६७ लाख, सुरक्षित गुंतवणूक ६ कोटी २७ लाख, उलाढाल १३६ कोटी ९ लाख, राखीव इतर निधी १ कोटी १० लाख, कर्जे १७ कोटी ५७ लाख, पैकी सोने तारण कर्ज १ कोटी ६६ लाख आहे. संस्थेला सन २०२३-२४ ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
संचालक प्रशांत शहा म्हणाले, संपूर्ण संगणकीकृत सेवा, जलद व तप्तर सेवा, आकर्षक व विश्वासार्ह कारभार, आकर्षक ठेव योजना, स्वमालकीची इमारत, कर्तव्यदक्ष संचालक मंडळ, सेवाभावी सेवक वृंद ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. नजीकच्या काळात संस्थेची अद्ययावत व सुसज्ज अशी इमारत बांधण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
यावेळी किशोर पोतदार, धोंडीबा मकानदार यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसभापती प्रकाश सणगर, शशिकांत दरेकर, साताप्पा पाटील, नामदेवराव पाटील, निवास कदम, संदीप कांबळे, संचालिका रोहिणी तांबट, सुनंदा जाधव, कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.