अडकुर येथील सामाजिक कार्यकर्ते सलीम कोवाडकर यांचे निधन

चंदगड :
अडकुर ता. चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते व अष्टविनायक गणेश मंडळाचे संस्थापक संचालक सलीम हुसेन कोवाडकर वय 58 वर्ष यांचे शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्व सलीम कोवाडकर हे येथील अष्टविनायक गणेश मंडळाचे स्थापनेपासून संस्थापक संचालक होते तसेच ते माजी ग्रामपंचायत सदस्य होते अडकुर येथील मोहरम कमिटीचे अध्यक्ष होते तर मुस्लिम समाजाचे ते माजी अध्यक्ष व आता मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक हि होते राजकीय क्षेत्रामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने महत्वाची भूमिका घेत असत त्यांचा स्वभाव दिलदार होता सर्वांशी ते मिळून मिसळून वागत असत येथील आदर्श ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे ते संस्थापक कर्मचारी म्हणून कार्यरत होते प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय असो किंवा समाज कार्य असो ते नेहमी अग्रेसर असायचे त्यांच्या अचानक जाण्याने अडकुर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होते आहे त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,4 भाऊ,पुतणे असा कोवाडकर मोठा परिवार आहे.