तरुणांना स्वबळावर उभे करण्यासाठी कटिबद्ध : प्रताप उर्फ भैय्या माने यांचे प्रतिपादन

सेनापती कापशी :
तरुणांना स्वबळावर सक्षमपणे उभे करण्यासाठी केडीसीसी बॅंकेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील असून समाजातील तरुण बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा असे मत प्रताप उर्फ भैय्या माने यांनी व्यक्त केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कडून मंजूर झालेल्या कर्ज प्रकरण पत्र वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी सांगितले की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली बँकेमार्फत अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळकडून कर्ज प्रकरणे मंजूर करून देत असून आजपर्यंत कोणताही गाजावाजा न करता पाचशेपेक्षा जास्त प्रकरणांना मंजुरी दिली त्यामुळे अनेक कुटुंबांना स्वबळावर उभे राहण्यासाठी मदत झाली असून भविष्यात देखील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, विशाल कुंभार ,राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गटातटाच्या पलीकडे जाऊन मदत
कर्ज प्रकरणे मंजूर करताना गट तट न पाहता समोरच्या तरुणाची गरज पाहूनच सर्व प्रकरणे मंजूर केली जात असून पाचशेपेक्षा जास्त प्रकरणे मंजूर झाली असून त्याचा कोणताही गाजावाजा केलेला नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या आदेशानुसार सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.
प्रताप उर्फ भैय्या माने.