ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

संभाजीनगर, कोल्हापूर आगारातील आंदोलकांना भेटून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर व पश्चिम महाराष्ट्राच्या सचिव रूपाताई वायदंडे यांनी संपाबाबत स्पष्ट केली पक्षाची भूमिका.

राज्य सरकार एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात असेच उदासीन राहिल्यास रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता जनजागरण मोहीम हाती घेऊन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रा. शहाजी कांबळे यांनी यावेळी दिला तसेच निलंबणाची नोटीस मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाहि अशी ग्वाही देत पक्षाच्या वतीने जाहिर पाठींबा प्रा. कांबळे यांनी घोषीत केला.

वेळप्रसंगी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र आंदोलन उभे करेल अशी भूमिका कोल्हापूर आगारातील आंदोलकांच्या माध्यमातून राज्यभरातील आंदोलकां पर्यंत पोहोचवत आहोत असे सांगून, एस.टी. कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असे आश्वासन रूपाताई वायदंडे यांनी आंदोलकांना दिले.

यावेळी पक्षचे पदधिकारी प्रताप बाबर, बटू भामटेकर, मलिक चिकदूळ, बैजू कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks