ताज्या बातम्या

ग्रामीण युवकांनी लघुउद्योगातून यशस्वी करिअर घडवावे : महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव  कॉ. नामदेवराव गावडे यांचे प्रतिपादन 

सावरवाडी प्रतिनिधी :

ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता विविध क्षेत्रात लघुउद्योगधंदे सुरू करून जीवनात यशस्वी करिअर केले की समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते . ध्येय आणि जिद्दीच्या बळावर करिअर घडवावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड नामदेवराव गावडे यांनी केले.

करवीर तालुक्यातील बीडशेड येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या सहा वर्धापन दिनानिमित्य  कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर सॅनिटायझर , मास्क व फळझाडांच्या आयोजित मोफत वितरण समारंभात गावडे बोलत होते .अध्यक्षस्थानी कुंभी कासारी साखर कारखाण्याचे संचालक उत्तमराव वरुटे होते.

यावेळी बोलतांना जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष व कॉग्रेस नेते शामराव सुर्यवंशी म्हणाले  ग्रामीण जनतेच्या सोयीच्या दृष्टीकोनातून उधोगधंद्यांना चालना देण्याचे काम सुशिक्षीत पिढीने करावे. 

यावेळी कुंभी कासारीचे संचालक उत्तमराव वरुटे , , सरपंच सर्जेराव तिबीले, पांडूरंग विकास संस्थेचे अध्यक्ष अमित वरुटे ,दिनकर सुर्यवंशी, मुकुंद पाटील , प्रताप पाटील , प्रकाश तिबिले, आदिची भाषणे झाली . प्रारंभी कृष्णात गावडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले . यावेळी सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळण्यात आले विविध मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थांना मास्क , सॅनिटायझर , व फळझाडांचे वितरण करण्यात आले 

कार्यक्रमास  बबन गावडे , सचिन पानारी , राजाराम गावडे, निवृत्ती गावडे , आकाराम गावडे , सुभाष पाटील, दिनकर गावडे , विनायक मस्कर , पांडूरंग कदम ,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks