ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुपाली चाकणकरांना मिळाला राज्यमंत्र्यांचा दर्जा

पुढील तीन वर्षांसाठी रुपाली महिला आयोगाच्या अध्यक्ष राहणार आहेत. रुपाली चाकणकरांना आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हाच त्यांना राज्यमंत्री पद देण्याबाबतही चर्चा सुरु होती, अखेर शुक्रवारी त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

NIKAL WEB TEAM :

रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांना राज्य सरकारकडून राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे.

पुढील तीन वर्षांसाठी रुपाली महिला आयोगाच्या अध्यक्ष राहणार आहेत. रुपाली चाकणकरांना आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हाच त्यांना राज्यमंत्री पद देण्याबाबतही चर्चा सुरु होती, अखेर शुक्रवारी त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजपा युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. रहाटकर यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर वर्षभर महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. पदावर चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली.

चाकणकर यांना आता राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यामुळे महिलांच्या बाबतचे प्रश्न सोडवण्यास त्यांना मदत मिळणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेचे ‘शक्ती’ विधेयक शुक्रवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाले. त्यानंतर चाकणकर यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला. यातून महाविकास आघाडी सरकारने महिला सुरक्षेबातत कडक धोरण अवलंबले असल्याचे दिसते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks