ताज्या बातम्यामहाराष्ट्र
“त्यांचं काय ठरलंय, काय ठरविलंय हे त्यांनाच विचारा”; संजय मंडलिक यांच्या विधानावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर :
खासदार संजय मंडलिक यांनी नवीन काय ठरविलंय हे त्यांनाच माहीत. त्यांचं काय ठरलंय, काय ठरविलंय हे त्यांनाच विचारा, अशा शब्दात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
मंडलिकांनी नवीन काय ठरविलंय हे त्यांनाच माहीत : ना. मुश्रीफ
रविवारी मंडलिक यांनी शिवसेना मेळाव्यात ‘आमचं नवीन ठरलंय’ म्हणून आम्हाला गृहीत धरू नका. तर आता नवीन ठरलंय आणि ते टोकाला नेणारच, अशी जाहीर भूमिका मांडली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता मुश्रीफ म्हणाले, आता संजय मंडलिकांनी काय ठरविलंय, त्यांचं काय ठरलंय हे मी कसं सांगणार. ते त्यांनाच माहीत असेल. भविष्यात जनताच काय ते ठरवेल. आज बोलून त्याचा काय उपयोग?