ताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यक्तिगत आणि सामाजिक विकासात हिंदी भाषेची भूमिका महत्त्वाची : डॉ. अर्जुन चव्हाण

पंचायत समिती शिक्षण विभाग भुदरगड आणि हिंदी अध्यापक मंडळ भुदरगड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या समृद्ध शिक्षक अभियान अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.

गारगोटी :

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर हिंदी भाषेने राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे मोठे कार्य केले आहे. हिंदी देश जोडण्याचे काम करते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर अर्जुन चव्हाण यांनी केले. गारगोटी येथे पंचायत समिती शिक्षण विभाग भुदरगड आणि हिंदी अध्यापक मंडळ भुदरगड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या “समृद्ध शिक्षक अभियान” अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. चव्हाण म्हणाले, हिंदी भाषेला फार मोठा इतिहास आहे. हृदयांना जोडणारी भाषा हिंदी आहे. तिचा प्रचार आणि प्रसार करणे हे हिंदी शिक्षकांचे कर्तव्य आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने होते.

स्वागत व प्रास्ताविक डॉ. आर. डी. पोवार यांनी केले. यावेळी डॉ. संजय चोपडे, दत्तात्रय कासारीकर, सुरेश पाटील, संजय गुरव, भानुदास डावरे, केंद्राध्यक्ष आबासाहेब पसारे, के. वाय. धम्मरक्षित, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन अभिजीत पोवार यांनी केले तर आभार डी. बी. देसाई यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks